१) सामाजिक ,समस्या
२) आर्थिक समस्या
३) शैक्षणिक समस्या
४) शहरीकरणाची समस्या
५) पर्यावरणाची समस्या
६) आरोग्यविषयक समस्य़ा
सामाजिक ,समस्या
ही समस्या अभ्यासताना वाढत्या लोकसंख्येमुळे व नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपुरा पुरवठा यामुळे अतिरीक्त लोकसंख्येचा ताण या संपत्तीवर पडतो देशात छुपी बेकारी वाढत असल्याने औद्योगिकिकरणामुळे त्याचा वेग कमी होतो.
एकुणच आपला देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर परीणाम झाल्याचे दिसते.
वाढत्या लोकसंख्येच्या समस्या अभ्यासताना त्यामध्ये सामाजिक समस्यांबरोबरच शैक्षणिक समस्या दिसुन येतात.
त्यामध्ये ,
१) निरक्षरता
२) शैक्षणिक प्रगतीत येणारे अडथळे
३) शैक्षणिक सुविधांचा अभाव
४) शैक्षणिक गुणवत्तेची कमतरता
शहरीकरणाची समस्या
१. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरणाच्या समस्या निर्माण होतात.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो.
२. ध्वनिप्रदुषण, जलप्रदुषण, वायुप्रदुषण इ. समस्या निर्माण होतात.
आर्थिक समस्या
वाढत्या लोकसंख्येमुळे आपल्या देशाचा आर्थिक विकास खुंटतो. देश जेवढा आर्थिकदृष्ट्या सबल व सक्षम तेवढी जलद गतिने प्रगती करतो. देशात आर्थिक समतोल नसेल तर तो देश प्रगति करु शकत नाही. देशाच्या आर्थिक विकासासाठी देशातील अर्थव्यवस्था मजबुत असणे आवश्यक आहे. आपल्या देशातील लोकसंख्या हि विकासाची फळे खात असेल तर आपल्या देशाचा खुंटल्याशिवाय राहणार नाही. वाढत्या लोकसंख्येबरोबरच देशातील रोजगार निर्मितीत वाढ झाली पाहिजे. या अशा विविध सनस्या सोड्विण्यास आपला देश सक्षम असला पाहिजे. आपल्या देशात कामगारांची समस्या व संख्या मुबलक प्रमाणात असताना सुध्दा या कामगारंमध्ये कुशल कामगार यांची संख्या कमी आहे. आपल्या देशात विकासाच्या दृष्टीने कामगार हा घातक ठरलेला आहे.
लोकसंख्या वाढीमुळे आरोग्यविषयक समस्या पर्यावरणाविष्यक समस्या अशा विविध समस्या निर्माण होतात देशातील लोक जंगलतोड करुन पर्यावरणाचा –हास करतो. वाढत्या लोकसंख्येमुळे मुलभुत गरजा व समस्या सोडवण्यात शासनाचा अधिक वेळ व पैसा वाया जातो. यामुळे औद्योगिकिकरणाकडे शासनाला लक्ष पुरवता येत नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढत असताना दुसरीकडे औद्योगिकिकरणाचा वेग मंद गतीने चालतो. या गोष्टीचा परिणाम राष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर होवुन देशाचा विकास खुंटतो.
अतिरिक्त लोकसंख्या असल्याने नागरीकांना निकृष्ट आहार, राहणीमान, आरोग्याच्या अपुर्ण सोयी तांत्रिक शिक्षणाचा अभाव, निरक्षरता, मुलभुत गरजांचा अभाव या सर्व गोष्टींवर परिणाम श्रमिकांच्या जीवनावर होतो. त्यामुळे श्रमिकांची उत्पादनक्षमता कमी होते. कुशल व सक्षम कामगारवर्ग नसल्याने देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो.
आपला देश हा कृषीप्रधान आहे. देशातील साठ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबुन आहेत. तसेच शेती ही पावसावर अवलंबुन असल्याने शेतीपासुन मिळणारे उत्पन्न हे निश्चित नसते. त्यामध्ये अनियमितता असते. तर याच व्यवसायावर सत्तर टक्के लोक अवलंबुन असल्याने लोकांचे दरडोई उत्पन्न अत्यंत कमी आहे. याच व्यवसायावर लोकसंख्येचा अतिरिक्त भार पडत असल्याने छुपी बेकारी या व्यवसायामध्ये वाढत आहे. शेती व्यवसाय हा आधुनिक पद्धतीने केला जात नसल्याने या व्यवसायाची प्रगती अत्यंत मंद गतीने होत आहे. या व्यवसायावर अकार्यक्षम कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात राबवत आहे. शेतीपासुन राष्ट्राच्या विकासाला कमी प्रमाणात हातभार लागत आहे. अकार्यक्षम कामगार वर्ग हा देशाच्या विकासाच्या दृष्टीने घातक ठरलेला आहे.
अशा प्रकारे विविध समस्यांमुळे लोकसंख्यावाढीवर परिणाम होतात.
No comments:
Post a Comment