Thursday 17 March 2011

व्यवस्थापनाची कार्ये


१)नियोजन:-
२)संघटन:-
3)समन्वय:-
४)संप्रेषण
५)दिग्दर्शन:-

६)अभिप्रेरण:-

१)नियोजन:-
एखादे कार्य करण्यापुर्वी ते कसे करावे हे अगोदर ठरवण्याच्या क्रियेला नियोजन म्हणतात. म्हणजेच पुढे करावयाच्या कामासंबंधी आधी ठरवण्याची क्रिया म्हणजे नियोजन.
१.                 नियोजनाने कार्यात यश संपादन करता येते.
२.                 कामाचा क्रम ठरवता येतो.
३.                 उपलब्ध साधनसंपत्ती मनुष्यबळ यांचा वापर होतो.
४.                 वेळ, पैसा,श्रम यांची बचत होते.
५.                 कर्मचार्यांच्या कृतीत संतुलन साधता येते.

२)संघटन:-
     समान उद्दीष्टांसाठी स्वखुशीने व परिणामकारक व ओळखु येणारा समुह म्हणजे संघटन.
१.                 संघटनाने कामाचे योग्य गटात कामाचे विभाजन केले जाते.
२.                 अधिकार व जबाबदारी यांची निश्चीती केली जाते.
३.                 व्यक्तीचे मनोबल व आत्मविश्वास वाढतो.
४.                 शालेय प्रगती साधता येते.
५.                 केलेल्या कामाचे समाधान मिळते.

३)समन्वय:-
  समुह प्रयत्नाचे रचनाबद्ध व्यवस्था म्हणजे समन्वय.
१.     प्रत्येक कामाच्या मर्यादा निश्चीत करता येतात.
२.     प्रत्येकाच्या अधिकार व मर्यादा आखुन देणे.
३.     सर्व कामकाज योग्य रितीने होते.
४.     योग्य मर्गाने समन्वय घडवुन आणणे.
५.     गटागटात योग्य समन्वय साधणे.

४)संप्रेषण
  दोन किंवा अधिक व्यक्तींच्या दरम्यान होणारी मते, कल्पना, भावना यांची देवाणघेवाण होय.
१.संप्रेषणामुळे व्यवस्थापनातील अडचणी दुर होतात.
२.उद्दीष्टांची पुर्ती योग्य प्रकारे साधता येते.
३.सहकार्यातील मतभेद दुर होतात.
४.मैत्रीची व सहकार्याची भावना वढीस लागते.
५. नवीन ज्ञानाची माहीती मिळते.

५)दिग्दर्शन:-
  प्रत्येक व्यवस्थापकाचे प्रमुख कार्य हे हाताखाली काम करणाय्रा व्यक्तींकडुन ते चांगल्या प्रकारे करवुन घेणे असते.
१.     कर्मचाय्राच्या कामाचे निरीक्षण करणे .
२.     आवश्यक तेथे मार्गदर्शन करणे.
३.     समस्यांचे निराकरण करणे.
४.     चुकांचे प्रबोधन करणे.
५.नवीन ज्ञानाची माहीती मिळते.

६)अभिप्रेरण:-
विशिष्ट दिशेने निश्चित ध्येयाकडे उद्युक्त करण्याची प्रक्रीया म्हणजे अभिप्रेरण.
१.व्यक्तीच्या सुप्त गुणांचा विकास होतो.
२.उपजत कलागुणांना वाव दिला जातो.
३.एकमेकांचा आदर करण्याची वृत्ती निर्माण होते .
४कामाविषयी आवड निर्माण होते.
५.कंटाळा व थकवा दुर होतो.

७)नेतृत्व:-
  कामगारांकडुन आत्मविश्वासाने व उत्साहाने काम पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करण्याची कला म्हणजे नेतृत्व.
१.नेतृत्व करणा-याकडे निर्णयक्षमता असावी.
२.संघटनकौशल्य असावे.
३.सह्कार्याची भावना असावी.
४.समायोजन करण्याची क्षमता असावी.
५.कल्पकता असावी.

1 comment: